Posts

Showing posts from March, 2024

अनुभवशिक्षणाचं अनपेक्षित दर्शन- Young Entrepreneursचा उत्स्फूर्त विक्री उपक्रम!

Image
०७/०३/२०२४ आज ह्या तीन young entrepreneurs ची भेट घडली! सातवीतले दोघे मित्र - वेदांत, शारंग, आणि तिसरा वेदांतचा लहान भाऊ अवनीश!      सकाळी नेहमीप्रमाणे गाडीवरून प्रबोधिनीत येत होतो. अलिकडच्या, एटीएम शेजारच्या फूटपाथकडे लक्ष गेलं, तर तिथे निळ्या गणवेशातली तीन मुलं फूटपाथवर बेडशीट अंथरून, त्यावर कसली तरी चित्र मांडून उभी आहेत असं दिसलं. काहीतरी वेगळं, विशेष चालू आहे हे लक्षात आलं, पण प्रशालेची वेळ पाळायची म्हणून धावत-पळत वर गेलो. छे! राहावलं नाही म्हणून बॅग ठेवून पुन्हा पळत खाली आलो.      गेलो तेव्हा अजूनही ते तिथेच आहेत हे पाहून बरं वाटलं. जरा ओळखीचे चेहरे वाटत होते, पण चटकन लक्षात आलं नाही. त्यांनी मात्र लगेच ओळखलं - "हृषीकेश दादा!? अरे आम्ही विज्ञान दलावर येत होतो!".       अरे व्वा! मग सुरू झाल्या गप्पा!      "इथे हे काय करताय?"      "दादा, आज आम्ही आमची स्वतः रंगवलेली चित्रं विकतो आहोत!"      "अरे वा! हे कसं काय सुचलं? कोणी सांगितलं तुम्हाला?"      "आमचं आम्हीच ठरवलं!"  ...