गणपती ओळखता आला पाहिजे...

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमूं शारदा मूळ चत्वार वाचा गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥ ------ (ह्या लेखाच्या निमित्तानी नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे. थोड्या थोड्या काळानी काही तरी लिखाण सुरू ठेवायचा प्रयत्न करणार आहे. प्रतिसाद ऐकायला नक्की आवडेल.) ------ कोण्या एका गावात एक दगडू काका राहत होते. गावात कोणताही समारंभ असला की त्याच्या तयारीत काका कायम पुढे! कोणाच्या घरी लग्न असो की बारसं. त्याची आमंत्रणं वाटायला, पूजा मांडायला, हार-फुलांनी सजावट करायला, शाल-श्रीफळ आणायला (काही वेळा द्यायलाही!) दगडू काका कायम अग्रेसर! गेल्या वर्षी गावचा गणेशोत्सव असाच एकदम थाटामाटात साजरा झाला. काकांनी पुढाकार घेऊन अतिशय दिमाखदार आरास केली होती. फुलांच्या माळा लावल्या. मूर्तीला मोठाले हार घातले. प्रतिष्ठापनेला भटजी बोलवले. त्यांनी "टॅणॅऽऽणॅणॅ... स्वाहा!" अशा नाकातून काढलेल्या, सुरेल पण दुर्बोध आवाजात मंत्रही सांगितले. अगदी पारंपरिक पद्धतीनी सर्व सोपस्कार होऊन सुंदर पूजा झाली आणि गणेशाची मूर्ती विराजमान झाली. दररोजच्या पूजेची ...