Posts

अनुभवशिक्षणाचं अनपेक्षित दर्शन- Young Entrepreneursचा उत्स्फूर्त विक्री उपक्रम!

Image
०७/०३/२०२४ आज ह्या तीन young entrepreneurs ची भेट घडली! सातवीतले दोघे मित्र - वेदांत, शारंग, आणि तिसरा वेदांतचा लहान भाऊ अवनीश!      सकाळी नेहमीप्रमाणे गाडीवरून प्रबोधिनीत येत होतो. अलिकडच्या, एटीएम शेजारच्या फूटपाथकडे लक्ष गेलं, तर तिथे निळ्या गणवेशातली तीन मुलं फूटपाथवर बेडशीट अंथरून, त्यावर कसली तरी चित्र मांडून उभी आहेत असं दिसलं. काहीतरी वेगळं, विशेष चालू आहे हे लक्षात आलं, पण प्रशालेची वेळ पाळायची म्हणून धावत-पळत वर गेलो. छे! राहावलं नाही म्हणून बॅग ठेवून पुन्हा पळत खाली आलो.      गेलो तेव्हा अजूनही ते तिथेच आहेत हे पाहून बरं वाटलं. जरा ओळखीचे चेहरे वाटत होते, पण चटकन लक्षात आलं नाही. त्यांनी मात्र लगेच ओळखलं - "हृषीकेश दादा!? अरे आम्ही विज्ञान दलावर येत होतो!".       अरे व्वा! मग सुरू झाल्या गप्पा!      "इथे हे काय करताय?"      "दादा, आज आम्ही आमची स्वतः रंगवलेली चित्रं विकतो आहोत!"      "अरे वा! हे कसं काय सुचलं? कोणी सांगितलं तुम्हाला?"      "आमचं आम्हीच ठरवलं!"  ...

The Universe is a Game

Image
  The Game      A few days ago, at Vijnana Dal, we gave students a challenge. This is the story about that activity and how we connected it to a larger pursuit.      The dadas (guides) had designed a simple card game by themselves, whose rules were known only to them. Two of the dadas sat everyone down in a circle around them and started playing the game, which was later dubbed ' Gillu ' (because, why not!).  It was a modified version of "Bhikar-Savkar" or "Beggar My Neighbour" where some choice and startegization were introduced in an otherwise random game.  The students could only observe. The challenge for them was to figure out the rules of the game through observation.     [The 2-player game starts with each player having 26 cards in hand. They are not allowed to look at the cards. Player 1 begins by compulsorily playing the top card (violating this gets a penalty of 2 cards). Player 2 now, can look at their top card. They can ...

गणपती ओळखता आला पाहिजे...

Image
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमूं शारदा मूळ चत्वार वाचा गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥ ------ (ह्या लेखाच्या निमित्तानी नवीन ब्लॉगला सुरुवात करतो आहे. थोड्या थोड्या काळानी काही तरी लिखाण सुरू ठेवायचा प्रयत्न करणार आहे. प्रतिसाद ऐकायला नक्की आवडेल.) ------      कोण्या एका गावात एक दगडू काका राहत होते. गावात कोणताही समारंभ असला की त्याच्या तयारीत काका कायम पुढे! कोणाच्या घरी लग्न असो की बारसं. त्याची आमंत्रणं वाटायला, पूजा मांडायला, हार-फुलांनी सजावट करायला, शाल-श्रीफळ आणायला (काही वेळा द्यायलाही!) दगडू काका कायम अग्रेसर!      गेल्या वर्षी गावचा गणेशोत्सव असाच एकदम थाटामाटात साजरा झाला. काकांनी पुढाकार घेऊन अतिशय दिमाखदार आरास केली होती. फुलांच्या माळा लावल्या. मूर्तीला मोठाले हार घातले. प्रतिष्ठापनेला भटजी बोलवले. त्यांनी "टॅणॅऽऽणॅणॅ... स्वाहा!" अशा नाकातून काढलेल्या, सुरेल पण दुर्बोध आवाजात मंत्रही सांगितले. अगदी पारंपरिक पद्धतीनी सर्व सोपस्कार होऊन सुंदर पूजा झाली आणि गणेशाची मूर्ती विराजमान झाली.      दररोजच्या पूजेची ...